एका माजी ‘कारसेवका’ची डायरी
६ डिसेंबर १९९२ या दिवशी मी कारसेवक म्हणून अयोध्येत होतो. मशीद पाडणाऱ्यांतही सहभागी झालो. पण नंतर भारतभर उसळलेल्या हिंदू –मुस्लीम दंगलींनी मला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेतून वाचत, विचार करत पुढे कट्टर हिंदुत्ववादी ते एक मुक्त, धर्मातीत माणूस असा आंतरिक प्रवास केला. आतल्या अस्वस्थतेतूनच ‘एक होता कारसेवक’ हे छोटेखानी पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक या पंचवीस वर्षांत अप्रस्तुत ठरायला हवं होतं, पण तसे होताना दिसत नाही.......